Breaking

अपनी भाषा चुने

POPUP ADD

सी एन आई न्यूज़

सी एन आई न्यूज़ रिपोर्टर/ जिला ब्यूरो/ संवाददाता नियुक्ति कर रहा है - छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशओडिशा, झारखण्ड, बिहार, महाराष्ट्राबंगाल, पंजाब, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटका, हिमाचल प्रदेश, वेस्ट बंगाल, एन सी आर दिल्ली, कोलकत्ता, राजस्थान, केरला, तमिलनाडु - इन राज्यों में - क्या आप सी एन आई न्यूज़ के साथ जुड़के कार्य करना चाहते होसी एन आई न्यूज़ (सेंट्रल न्यूज़ इंडिया) से जुड़ने के लिए हमसे संपर्क करे : हितेश मानिकपुरी - मो. नं. : 9516754504 ◘ मोहम्मद अज़हर हनफ़ी - मो. नं. : 7869203309 ◘ सोना दीवान - मो. नं. : 9827138395 ◘ आशुतोष विश्वकर्मा - मो. नं. : 8839215630 ◘ सोना दीवान - मो. नं. : 9827138395 ◘ शिकायत के लिए क्लिक करें - Click here ◘ फेसबुक  : cninews ◘ रजिस्ट्रेशन नं. : • Reg. No.: EN-ANMA/CG391732EC • Reg. No.: CG14D0018162 

Thursday, May 14, 2020

'केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच, आता तुम्ही काहीतरी करून दाखवा'

मुंबई : 'मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? ,' असे सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला विचारले आहे. तसेच 'केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना!,' असा इशारा शेलार यांनी दिला आहे.

तसेच पुढे शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना शेलार म्हणतात, 'देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल!'.


मात्र तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, 4 चे सूतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Hz Add

Post Top Ad